तुमच्या स्वयंपाकघरात असलेले अनेक मसाले हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात, ज्याचा आरोग्याला फायदा होतो. सांध्यासोबतच आतड्यातील जळजळ कमी करण्यासही काळीमिरी उपयुक्त आहे. काळीमिरीच्या सेवनाने जळजळ आणि अतिरिक्त वात विकारांपासून आराम मिळतो. चांगल्या आरोग्यासाठी दररोज 1 काळी मिरी खावी. सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरी चघळणे फायदेशीर आहे. श्वसनाच्या समस्यांसाठी 1 चमचा मध आणि थोडी हळद सोबत घ्या. झोपेच्या वेळी दुधात चिमूटभर सुंठ पावडर टाकून प्यायल्याने चांगली झोप येते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.