बॅडमिंटनला एक उत्तम खेळ म्हटले जाते. जगभरात याला खूप पसंती दिली जाते.
बॅडमिंटन खेळल्याने शरीराला मोठे फायदे होतात. हा खेळ खेळल्याने शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते.
एक्सपर्टच्या मते बॅडमिंटन खेळल्याने मन,हृदय आणि वजन देखील नियंत्रणात राहते. काय आहेत बॅडमिंटनचे फायदे पाहूयात.
बॅडमिंटन हा असा व्यायाम आहे जो शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी जाळून टाकण्यास मदत करतो.
हे खेळल्याने कार्डिओ व्यायाम होतो आणि स्नायू सक्रिय होतात. स्नायूंमध्ये लवचिकता येते.
फक्त एक तास नियमित बॅडमिंटन खेळल्याने शरीरातील 480 कॅलरीज बर्न होऊ शकतात.
बॅडमिंटन खेळल्याने तुमचे हृदय निरोगी राहते.
नियमितपणे बॅडमिंटन खेळून तुम्ही तुमच्या शरीरातील चयापचय गती वाढवू शकता.
बॅडमिंटन खेळल्याने हाडांना पुरेशी ताकद मिळते. हाडे मजबूत बनतात.
बॅडमिंटन खेळल्याने, स्नायू सक्रिय आणि टोन्ड होतात, ज्यामुळे शरीराला एक परिपूर्ण आकार मिळण्यास मदत होते.