डायरी लिहिणे ही काही लोकांच्या सवयींपैकी एक आहे. त्याच वेळी, आपल्या भूतकाळातील विशेष घटना आणि आठवणी लक्षात ठेवाण्याकरता डायरीत लिहिणे गरजेचे आहे.

बरेच लोक त्यांच्या मनातील भावना कोणाशीही उघडपणे मांडू किंवा शेअर करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही डायरी लिहिण्याची सवय लावू शकता.

आपल्या मनात असणाऱ्या भावना आपण डायरीत लिहिल्याने आपले मन मोकळे होण्यास मदत होते.

दिवसभर आपल्यासोबत जे काही घडत असेल ते प्रत्येकाने आपल्या डायरीत लिहावे. यावरून तुम्ही दिवसभरात काय केले, काय मिळवले आणि काय गमावले हे समजून येते.

बऱ्याच लोकांना जास्त बोलायला आवडत नाही किंवा त्यांचा स्वभाव लाजाळू असतो. त्यामुळे ते लोकांमध्ये बोलू शकत नाहीत. अशा वेळी दैनंदिन जीवनात जे काही घडत असेल ते डायरीत लिहिणे गरजेचे आहे.

आजकाल लोकांकडे वेळ खूप कमी आहे. अशा वेळी तुमचे ऐकणारे किंवा तुम्हाला वेळ देणारे कोणी तुमच्याकडे नसेल तर डायरी लिहिण्याची सवय लावा.

वाढदिवस असो की लग्नाचा वाढदिवस, ऑफिस किंवा घरातील कोणताही मोठा कार्यक्रम असो किंवा कोणतीही मीटिंग असो, लोक या गोष्टी विसरतात. अशा परिस्थिती डायरी तुमच्या कामी येऊ शकते.

इलेक्ट्राॅनिक उपकरणांमुळे लिहिण्याची सवय मोडली आहे. अशा वेळी डायरी लिहिणे तुमच्याकरता फायद्याचे ठरू शकते. यामुळे तुमची लिहण्याची सवय मोडणार नाही.

डायरीत तुम्ही तुमचे लक्ष्य , संकल्प लिहून ठेवल्याने तु्म्हाला याचा फायदा होऊ शकतो. यामुळे तुम्हाला तुमचे लक्ष्य मिळवणे सोपे जाऊ शकते.

डायरी लिहिल्यामुळे मन शांत होतं. कोणता ताण असेल तर तो दूर होतो.