घरांत कुत्रा पाळलेला असतो त्या घरातील व्यक्तींना कोलेस्ट्रॉल, बीपी सारख्या समस्यांचा जास्त त्रास होत नाही.

कुत्रा हा इमानदार प्राणी असल्यामुळे घरामध्ये शांतता आणि सकारात्मक वातावरण राहते.

घरात कुणी नसल्याने प्रेम आणि भावना व्यक्त करता न आल्याने नैराश्य येते पण घरात पाळीव कुत्रा असल्यास तुमचा एकांतपणा दूर होतो.

घरात पाळीव कुत्र्यासोबत १० मिनिटांहून अधिक काळ खेळल्याने,थोपटल्याने आपला ताणतणाव कमी होतो.

घरात पाळीव कुत्रा असल्यास तुमच्या शारीरिक हालचाली सुद्धा होतात, यामुळे लठ्ठपणा,आळस या समस्या भेडसावत नाहीत.

तुमच्या मुलांचा सर्वात चांगला मित्र कुत्रा बनतो तो त्यांची काळजीपण घेतो.

ज्या मुलाला जबाबदारीबद्दल शिकण्याची गरज आहे त्यासाठी कुत्रा तुमचा महान सहकारी असेल, हळूहळू आपण जबाबदारीने वागायला लागाल.

कुत्रे घड्याळासारखे आहेत,एकदा त्यांना वैयक्तिक दिनचर्येची सवय झाली की तुम्हाला ते पहाटे उठून लागतात.

कुत्रा हा आपल्या घराचा राखणदार असतो त्यामुळे चोरी किंवा इतर समस्या दूर होतात.

तुम्ही कुत्रा दत्तक घेण्याचे ठरवले तर तुम्हाला निःसंशयपणे एक दयाळू सहचर लाभेल