एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपट आलियापूर्वी अनेक अभिनेत्रींना ऑफर करण्यात आला होता.
आरआरआरच्या निर्मात्यांनी श्रद्धा कपूरला या चित्रपटासाठी ऑफर दिली होती. परंतु, अभिनेत्रीचे वेळापत्रक इतके व्यस्त होते की, तिने हा चित्रपट नाकारला.
रिपोर्ट्सनुसार, परिणीती चोप्रालाही ‘आरआरआर’ची ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी अभिनेत्री केसरी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती.
रिपोर्ट्सनुसार, एमी जॅक्सनलाही ‘आरआरआर’मध्ये सीतेच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. परंतु, अभिनेत्री त्यावेळी गर्भवती होती, त्यामुळे तिने हा चित्रपट नाकारला.
ब्रिटीश अभिनेत्री डेझी एडगर जोन्स हिला देखील या चित्रपटाची ऑफर करण्यात आली होती. परंतु, अभिनेत्रीने ही भूमिका नाकारली.
यानंतर ‘आरआरआर’साठी निर्मात्यांनी आलिया भट्टशी संपर्क साधला असता, अभिनेत्रीने लगेच होकार दिला.
आलिया भट्टने होकार दिल्यानंतरच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटासाठी आलियाने प्रचंड मेहनत घेतली आणि आज त्याचे यश संपूर्ण जगासमोर आहे.