सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर आलिया आणि रणबीर लवकरत विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध साडी डिझायनर बिना कन्ननने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत आलिया आणि रणबीर दोघेही दिसत आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये, रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत असे लिहिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये आलिया आणि रणवीर खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. फोटोमध्ये आलियाने पांढरा कुर्ता परिधान केला आहे, तर रणबीर निळ्या रंगाच्या शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. बिना कन्ननने शेअर केलेला फोटो समोर येताच रणबीर आणि आलियाने लग्नाच्या खरेदीची लगबग सुरू केली आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. काही युजर्सनी कमेंट करून विचारले आहे की, हे जोडपे लग्न करण्याच्या तयारीत आहे का? एका यूजरने विचारले की, लग्न कधी आहे?