झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.
शिवानीने या मालिकेत ‘शीतल’ ही भूमिका साकारली होती. मालिकेतच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही तिला ‘शीतली’ म्हणूनच प्रेक्षक ओळखत होते.
‘लागिरं झालं जी’ ही शिवानीची पहिलीच मालिका होती. अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी शिवानी एका कंपनी जर्मन ट्रान्सलेटर म्हणून काम करायची.
सध्या शिवानी कामातून ब्रेक घेऊन, कुटुंबासोबत हिमाचल फिरायला गेली आहे.
अभिनेत्री हिमाचलमधून आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे. सतत कामत व्यस्त असणाऱ्या शिवानीने आता काही काळासाठी ब्रेक घेतला आहे.
शिवानी बावकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहतेही तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत असतात.
शिवानीची 'कुसुम' ही मालिका नुकतीच ऑफ एअर गेली आहे. त्यामुळेच अभिनेत्रीला थोडासा मोकळा वेळ मिळाला आहे. हा वेळ ती आपल्या कुटुंबासोबत घालवत आहे.