मराठी मनोरंजन सृष्टीतील फास्टर फेने अर्थात अमेय वाघ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमेय वाघने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत हटके पोस्ट लिहिली आहे. अमेयने पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना टोमणा मारला आहे. अमेय वाघचा 'झोंबिवली' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. अमेय वाघची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेय वाघने लिहिलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेय वाघने पोस्ट करत लिहिले आहे,माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत… त्यांना आरसा! अमेयच्या या बोलक्या पोस्टनं नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे.