जर तुम्हाला बीटचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही त्याचा ज्यूस देखील पिऊ शकता.



बीट तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी बनविण्यास मदत करते.



यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते, त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.



व्यायाम करण्यापूर्वी बीटचा रस प्यायल्यास स्टॅमिना वाढतो. एक ग्लास बीटरूट ज्यूस प्यायल्याने त्वरित ऊर्जा मिळते.



बीटरूट ज्यूस प्यायल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. यामध्ये आढळणारे फायटोन्यूट्रिएंट्स कॅन्सरविरूद्ध प्रभावी आहेत.



जे लोक रोज बीटचा रस पितात त्यांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते,



बीटमध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि भूक कमी लागते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.