अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे.



पुढील वर्षी 22 जानेवारीला प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.



या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत.



हा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी श्री राम मंदिर ट्रस्टकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.



या काळात देशभरातून मोठ्या संख्येने लोक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे.



नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज सुमारे 75 हजार लोक राम मंदिरात शकतील.



श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सदस्य नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.



त्यानंतर 22 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल.



26 जानेवारीपासून राम मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे.



राम मंदिराची उंची 161 फूट असणार आहे. हे मंदिर 28000 वर्ग क्षेत्रावर बांधण्यात येत आहे.



380 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच गगनचुंबी असं मंदिराचं भव्य बांधकाम आहे.