अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून

आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल.

अनंत चतुर्दशीसाठी मुंबई महापालिकेने यंदाही जय्यत तयारी केली आहे.

गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan 2023) मुंबई महापालिकेचे 10 हजार कर्मचारी असणार आहेत.

गणेश भक्तांच्या सोयीसाठी 71 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

त्याशिवाय, घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी 198 कृत्रिम तलावही तयार करण्यात आले

असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवरही मोठी जबाबदारी गणेश विसर्जनाच्या दिवशी असते.

गणेश विसर्जनाच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी ऑनलाईन करता येणार आहे.

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला साडेदहा वाजता सुरुवात होईल.