उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये एक दुर्घटना घडलीये. शकूर बस्ती येथून येणाऱ्या ईएमयू ट्रेनला मथुरा जंक्शनवर अपघात झाला. ही ट्रेन अचानक रूळ सोडून प्लॅटफॉर्मवर चढली. सुदैवाची बाब म्हणजे, हा अपघात झाला तेव्हा ट्रेनमध्ये प्रवासी उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवीतहानी टळली आहे. अपघातानंतर रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला, लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. काही काळासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर भितीचं वारावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या अपघाताचा तपास केला जात आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा जंक्शनवर रात्री उशिरा रेल्वे अपघात झाला. शकूर बस्तीकडून येणारी एक ईएमयू (EMU) गाडी थेट मथुरा रेल्वे स्थानकाच्या फलाटावर चढली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळत आहे.