अवनीत कौर सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अभिनेत्री तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत येऊ लागली आहे. अवनीत तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा वाढवते आता पुन्हा एकदा अवनीतने तिचा सिझलिंग लुक शेअर केला आहे. यामध्ये तीने ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्लू जीन्स परिधान केलेला दिसत आहे. अवनीत या लूकमध्ये नेहमीप्रमाणे खूपच हॉट दिसत आहे. अवनीत कौरने टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत तिच्या उत्कृष्ट अभिनयाने थक्क केले आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी ही अभिनेत्री तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या लूक आणि स्टायलिश स्टाइलमुळे चर्चेत येऊ लागली आहे. अवनीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच कंगना राणौतच्या 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अवनीत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.