दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी चर्चेत असते. कोणतीही व्यक्तिरेखा ती अतिशय चांगल्या पद्धतीने साकारू शकते हे तिने फार कमी वेळात सिद्ध केले आहे. लहान वयातच जान्हवीने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. जान्हवी तिच्या लूकमुळे दररोज चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि तिच्या नवीन फोटोशूटची झलक चाहत्यांसह शेअर करत असते आता पुन्हा एकदा जान्हवीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा चढवला आहे लेटेस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर ब्लु कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. जान्हवीने तिचा लुक फ्लॉंट करताना एकामागून एक बोल्ड पोज दिल्या आहेत.