सांगलीतील विजय देसाई या द्राक्षबागायतदाराने साडे सहा सेमी मण्याची लांबी असलेल्या द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध लावला होता.



आता द्राक्षाच्या या नव्या जातीला भारत सरकारकडून व्हीएसडी सीडलेसचे (VSD Seedless) पेटंट मिळाले आहे.



जास्त गोडी, कमी खर्चात जास्त उत्पादन आणि मण्यांची विक्रमी साडेसहा सेमी लांबी ही या द्राक्षाच्या जातीची वैशिट्ये आहेत.



द्राक्षाच्या नवीन वाणामुळे शेतकऱ्यांना आणखी एक द्राक्षाचे वाण लागवड करण्यास मिळणार आहे



विजय देसाई यांनी या जातीच्या रोपांच्या काड्या तयार करुन ठेवल्या आहेत



सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांमध्ये या द्राक्षाची बरीच चर्चा देखील झाली.



त्यांच्याकडे 13 एकर द्राक्षबाग आहे. त्यात पावणेदोन एकर क्षेत्रावर या नवीन वाणाची द्राक्षे आहेत.



गेली आठ वर्षे प्रयोग करुन त्यांनी हे क्षेत्र वाढवले आहे.



मागील काही वर्षात 501 रुपयांनी देसाई यांचा माल व्यापाऱ्यांनी घेतला.