'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आता निळ्या विश्वाची जादू प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. 'अवतार 2' हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'अवतार 2' या सिनेमाने चांगलाच धमाका केला. जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित 'अवतार 2' हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. 'अवतार 2' या सिनेमाची निर्मती 400 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.28 बिलियन डॉलरची कमाई केली आहे. 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा ब्लू रे आणि डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 28 मार्चपासून प्रेक्षकांना 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे.