सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. 'अवतार 2' हा सिनेमा प्रेक्षक प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हा सिनेमा भावला आहे. 'अवतार 2' या सिनेमाची निर्मती 400 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.28 बिलियन डॉलरची कमाई केली आहे. जगभरात 'अवतार 2' या सिनेमाची क्रेझ कायम आहे. जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची नाळ एका अद्भुत दुनियेशी जोडली गेली आहे. समुद्र, समुद्रातील प्राणी त्यांच्यातील विविधता अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारा 'अवतार 2' हा सिनेमा आहे. 'अवतार 2' या सिनेमाने 'ऑस्कर 2023' या पुरस्कार सोहळ्यातदेखील बाजी मारली आहे. 'अवतार 2' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्याने निळ्या विश्वाची जादू प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे.