हॉटलाईन मेंटेनन्स व्हेइकल कसं काम करतं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

दिल्लीला देशातील पहिलं हॉटलाईन मेंटेनन्स व्हेइकल मिळालं आहे.

Image Source: pti

दिल्ली सरकारनं हे राजधानीच्या वेगवेगळ्या भागात लावण्याची योजना आखली आहे.

Image Source: pti

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या हॉटलाइन मेंटेनन्स व्हेईकलची सुरुवात केली आहे.

Image Source: pti

हॉटलाईन मेंटेनन्स व्हेइकल कसं काम करतं?

Image Source: pexels

हॉटलाइन मेंटेनन्स व्हेईकलच्या मदतीनं वीज खंडित न करताच दुरुस्ती करता येते.

Image Source: pexels

यापूर्वी वीज कनेक्शन किंवा उपकरणं दुरुस्त करण्यासाठी वीज पुरवठा बंद करावा लागत होता, पण आता तसं होणार नाही.

Image Source: pexels

या गाडीत खास इन्सुलेटेड म्हणजे, करंटपासून वाचवणारे टूल्स बसवले आहेत.

Image Source: pexels

यामध्ये नॉन-कंडक्टिव्ह प्लॅटफॉर्म आहे, ज्यामुळे लाईनमनला करंट लागणार नाही.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, यात हायड्रॉलिक प्रणाली देखील आहे, जी उंचीवर काम करण्यास मदत करते.

Image Source: pexels

याला लाइव्ह लाईन मेंटेनन्स असंही म्हणतात, ज्यामुळे विजेच्या तारा बदलता येतात आणि जंपरची दुरुस्तीही करता येते.

Image Source: pexels