टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे.

गिलनं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकलं आहे.

शुभमन गिल गेल्या एका वर्षापासून फॉर्ममध्ये आहे.

एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 अशा तिनही फॉरमॅटमध्ये त्यानं चमकदार कामगिरी केली आहे.

एकदिवसीय फॉर्मेटमध्ये शुभमन गिलनं इतकी चांगली कामगिरी केली की,

भारतीय संघ व्यवस्थापनाला शिखर धवनसारख्या तेजस्वी खेळाडूकडेही दुर्लक्ष करावं लागलं.

शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्यामुळे वर्ल्डकपसाठी उशिरा प्लेईंग इलेव्हनमध्ये उशिरा समावेश करण्यात आला.



एकीकडे शुभमन गिलनं जबरदस्त परफॉर्मन्स दिला, तर
दुसरीकडे बाबर आझमला एका एका धावेसाठी मोठी कसरत करावी लागत होती.


शुभमन गिल 830 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.



शुभमन गिल याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.