बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लग्न सोहळ्यासाठी त्यांनी एका खास ठिकाणाची निवड केली आहे. सुनील शेट्टीच्या बंगल्याचे नाव 'जहाँ' असे आहे. केएल राहुल आणि अथिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्न बंधनात अडकू शकतात. अथिया शेट्टी अनेकदा केएल राहुलसोबत क्रिकेट टूरवर जाताना दिसते. मीडिया रिपोर्टनुसार केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही एकत्र एकाच घरात शिफ्ट झाले आहेत. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे बोलले जात आहे. अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो'मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. अथियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळालीय.