हिंदू धर्मात जेव्हा व्यक्तीचे निधन होते तेव्हा श्मशानातुन घरी परत येताना मागे वळून न पाहणे ही प्रथा आहे. पण याचे कारण माहिती आहे का?
या परंपरेला गरुड पुराणात काही कारणे सांगितली आहे. गरुड पुराण हे हिंदू धर्मांतील प्रमुख ग्रंथ आहे . ज्यामध्ये मृत्यूच्या नंतरची प्रक्रिया पूर्णपणे सांगण्यात आली आहे.
गरुड पुराणच्या नुसार आत्म्या हे शरीरासोबत खूप जुडलेलं असतं. अंतिम संस्कारच्या वेळी आत्मा हे शरीरासोबत जुडलेलं असू शकते. आणि शरीराला अग्नी लागलेली सुद्धा पाहू शकते.
जर कोणी व्यक्ती मागे वळून पाहतो तर आत्म्याला असे संकेत मिळतात की अजूनही कोणीतरी त्यासोबत राहण्याची इच्छा ठेवते. यामुळे आत्म्याचा मोह वाढण्याची शक्यता असते.
गरुड पुराणच्या अनुसार मोहमध्ये असल्या कारणामुळे आत्म्याला मुक्ती मिळण्याच्या यात्रेमध्ये अडचणी येतात.
गरुड पुराणच्या अनुसार अंतिम संस्कारच्या वेळी मागे न वळून पाहणे याचे मुख्य कारण म्हणजे आत्म्याला शांतिपूर्व मुक्ती प्रदान करण्यासाठी आणि पुढच्या जन्मी बांधण्यापासून वाचवायचे आहे.
ही सुद्धा मान्यता आहे की मागे वळून पहिले तर आत्माचे या संस्कारात राहण्याचा मोह वाढू शकतो, आणि आत्मा हा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात सुद्धा प्रवेश करू शकतो. यामुळे त्या व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक कष्टांचा सामना करावा लागू शकतो