परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी थोडे बळ एकवटावे लागेल.
दुसऱ्यावर कुरघोडी केली नाही तरी थोडा अहंकाराचा भाग राहणार आहे.
दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही, महिला समजून घेतील.
जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. व्यवसायात बरीच उलाढाल कराल.
तुम्ही मांडलेली मते दुसऱ्याच्या गळी उतरवाल. मनात नसताना प्रवासाला जावे लागेल.
नोकरीमध्ये जेथे पाहिजे तेथे प्रवासाला पाठवणार नाहीत, त्यामुळे थोडी चिडचिड होईल.
अत्यंत आशावादी दिवस आहे. राजकारणी लोक आपला मत्सद्दीपणा दाखवतील.
आज अडचणीला तोंड देताना थोडा त्रास होईल. तब्येत चांगली ठेवा.
विद्यार्थ्यांना बौद्धिक बाजू शैक्षणिक क्षेत्रात चांगली संभाळता येईल.
एखाद्या स्पर्धेमध्ये चांगले यश मिळू शकते. महिला थोड्या अशांत राहतील.
तुमच्या हजरजबाबीपणामुळे लोकांवर प्रभाव पाडाल.
आज उठसूट दुसऱ्यावर टीका करण्याचे टाळा, नाहीतर त्रास होईल.