आज तुमच्या मताशी तुम्ही ठाम राहणार आहात.
कोणत्याही कामासाठी इतरांचा होणारा विरोध हाणून पाडाल.
खूप व्यवहारी आणि हिशेबी वृत्तीने वागून चालणार नाही.
फायद्याबरोबर तोटेही सहन करावे लागतील.
संततीच्या वागण्या बोलण्याचा त्रास होईल. महिलांनी अहंकार ठेवू नये.
नवीन जागेसंबंधी केलेले व्यवहार यशस्वी होणार नाहीत.
नोकरी व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन उपयोगी पडणार आहे.
वैवाहिक जीवनात थोडे वाद-विवाद होऊ शकतात. सामंजस्याचं धोरण स्वीकारा.
अनपेक्षित खर्चाला तोंड द्यावे लागेल. कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आर्थिक तमीला सामोरे जावे लागेल. तरुणांनी अति आत्मविश्वास बाळगू नये.
आज आपल्या कामाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. महिला लोकांना आपलेसे करून घेतील.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे. कोणताही निर्णय पटकन घेता येणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.