सोन्याला धन, समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं.



ज्योतिषशास्त्रानुसार, सोन्याचा किंवा सुवर्णाचा संबंध गुरु ग्रहाशी असतो.



आणि त्याचबरोबर सोन्याला लक्ष्मीचं रूप मानलं जातं.



सोन्याबद्दल शकुन शास्त्रामध्ये अनेक मान्यता सांगितल्या आहेत.



यापैकीच एक म्हणजे, सोनं किंवा सोन्याचे दागिने हरवणे किंवा चोरीला जाणे.



शकुन शास्त्रानुसार, सोनं गमावणं आर्थिक नुकसानीचं लक्षण आहे.



सोनं गमावणं हे शारीरिक नुकसानासोबतच अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्रातही चांगलं मानलं जात नाही.



सोनं गहाळ होणं, म्हणजेच, हरवणं अशुभ ग्रहांच्या प्रभावामुळे आणि दुर्दैवाला वाढवणारं असतं.



जर वारंवार सोन्याचं नुकसान होत असेल, तर हे गुरु ग्रहाच्या दुर्बलतेचं आणि नशिबातील कमतरतेचं लक्षण आहे.



टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.