गणपती विसर्जनाच्या उत्तरपूजेचा विधी आणि मंत्र!

Published by: जगदीश ढोले
Image Source: PINTEREST

गणेशोत्सवाचा सण राज्यात अगदी जल्लोषात सुरु आहे. घरोघरी बाप्पा विराजमान झाल्यावर अवघ्या दीड दिवसांनी घरगुती बाप्पाचं विसर्जन केलं जातं.

Image Source: PINTEREST

अशा वेळी गणपतीची उत्तरपूजा कशी करावी असा अनेकांना प्रश्न पडतो.

Image Source: PINTEREST

गणपतीचं विसर्जन करताना कोणते विधी आणि मंत्र उच्चारले जावेत याचविषयी अधिक जाणून घेऊयात.

Image Source: PINTEREST

सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपती बाप्पाची पंचोपचार पूजा करावी. बाप्पाला मोदक, लाडू आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि नवीन वस्त्रे अर्पण करावीत.

Image Source: PINTEREST

आचम्य :

श्रीसिद्धिविनायकमहागणपतीप्रीत्यर्थं गंधादिपंचोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये । महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामिः । अक्षतां हरिद्रां कुंकुमं समर्पयामि। श्रीमहागणपतये नमः । सिंदूरंदूर्वांकुरान् कालोद्भवपुष्पाणिच समर्पयामि ।

Image Source: PINTEREST

हे मंत्र म्हणून गणपतीला गंध, फुले, अक्षता, हळद कुंकू, दूर्वा, शेंदूर हे अर्पण करावे.

श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि ।

महागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।

महागणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि ।

Image Source: PINTEREST

वरील मंत्र म्हणून गणपतीला धूप, दीप ओवाळावा , नैवेद्य दाखवावा आणि कापूर लावून आरती करावी.

Image Source: PINTEREST

पूजेच्या शेवटी दिलेले मंत्रपुष्प आणि प्रार्थनेचे मंत्र म्हणून एका कापडात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि काही पैसे ठेवावे. या सगळ्या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवावे .

Image Source: PINTEREST

विसर्जनापूर्वी गणपतीची मनापासून आरती करावी आणि या काळात आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागावी. तसेच, पूजेचे साहित्य विसर्जित करावे.

Image Source: PINTEREST

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)