एक युवकानं प्रेमानंद महाराजांना विचारलं, वाढदिवसाचं काही आध्यात्मिक महत्त्व आहे का? तो कसा साजरा करावा?



ज्याच्या उत्तरादाखल प्रेमानंद महाराज म्हणाले की, आम्हाला तर वाढदिवस शोक दिवस वाटतो, कारण जीवनातून एक वर्ष आणखी कमी होतं.



आम्हाला माहीत नाही की, आता आपल्याकडे किती तास, किती मिनिटं आणि किती सेकंद आहेत...



जन्मदिवसाच्या दिवशी, आपण संतांची आणि गाईंची सेवा केली पाहिजे.



कारण की, आपल्या आयुष्यातलं एक वर्ष वाढलं नाही, तर कमी झालं आहे.



आपण वाढदिवसाला संकल्प केला पाहिजे की, येणाऱ्या वर्षात आपण कोणाचंही वाईट करणार नाही.



जर वाढदिवस साजरा करायचा असेल, तर नाम जप किंवा कीर्तन करा, सात्विक भोजन बनवा आणि सर्वांना खाऊ घाला.



जन्मदिवसाच्या दिवशी भजन कीर्तन करा आणि संतांची सेवा करा. शक्य असल्यास, जास्तीत जास्त लोकांची सेवा करा.



कारण की, आपल्या आयुष्यातील एक वर्ष कमी झालं आहे, आणि आपल्याला माहीत नाही की, अजून किती वेळ शिल्लक आहे.