माणसाच्या कर्माचे फळ आणि बऱ्याचदा ग्रहांची अशुभता त्यांच्या अकाली मृत्यूचे कारण ठरतात.



अकाली मृत्यूसाठी मुख्यत्वेकरून शनी, मंगळ, राहू आणि केतूसारख्या ग्रहांना जबाबदार धरले जाते.



राहू-केतू ग्रह आठव्या घरात किंवा इतर अशुभ स्थानात स्थित असतील तर अकाली मृत्यूची शक्यता निर्माण होते.



कुंडलीतील मंगळ ग्रह दुसर्‍या, सातव्या किंवा आठव्या स्थानी आणि त्यावर सूर्याची पूर्ण दृष्टी असते.



अशा स्थितीत व्यक्तीचा आगीत मृत्यू होण्याची शक्यता असते.



राहू आणि मंगळ ग्रहांची युती किंवा समसप्तक होऊन एकत्र येणे हे सुद्धा अकाली मृत्यूचे कारण ठरते.



लक्षात घ्या, मृत्यू टाळता येतो. यासाठी रोज 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करा.



पितरांचे नियमितपणे तर्पण, श्राद्ध कर्म करत राहा. तसेच, दानधर्म करा.