गाय आणि वासराच्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणजेच वसुबारचा सण.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexel

वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त

वसुबारस तिथीची सुरुवात : सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 53 मिनिटांपासून सुरु झाला आहे. तर, मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05 वाजून 04 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असेल.

Image Source: Pexel

काय आहे वसुबारसची प्रथा?

या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते.

Image Source: Pexel

समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.

Image Source: Pexel

या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.

Image Source: Pexel

ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.

Image Source: Pexel

काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.

Image Source: Pexel

घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते.

Image Source: Pexel

अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी हिंदू परंपरेनुसार, गहू, मूग खात नाहीत.

Image Source: Pexel

स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून वसुबारसची पूजा केली जाते.

Image Source: Pexel

या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे.

Image Source: Pexel


अशा प्रकारे हा अत्यंत साधा विधीपूर्वक करण्याचा हा दिवस आहे.


टीप :
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )