कन्या राशीच्या लोकांसाठी जुलै 2024 खूप छान असणार आहे. हा महिना भविष्यासाठी खूप चांगला ठरणार आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बौद्धिक क्षमतेद्वारे अनेक उद्दिष्टं साध्य होतील. अनियंत्रित खाण्याच्या सवयीमुळे वजन वाढू शकतं. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन काम सुरू करण्यापूर्वी दक्षता घेणं आवश्यक आहे. रागाच्या भरात काहीही बोलू नका, अन्यथा अनावश्यक टिप्पण्यांमुळे वाद होऊ शकतात. तिसऱ्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काही बदल दिसून येतील. धार्मिक रूची दिसून येईल. परदेशी संपर्कातून लाभ होईल. चौथ्या आठवड्यात आर्थिक जोखीम घेऊ नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. करिअरमधून चांगली बातमी मिळेल. व्यवसायात यश मिळेल. राग वाढण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. गोड बोलणं लाभदायक ठरेल.