मेष रास (Aries)

आज तुमच्या यशाचं गमक तुमच्या इच्छाशक्तीत असणार आहे. गोड बोलून आपले काम व्यवस्थित करून घ्यावे.

वृषभ रास (Taurus)

हाती बऱ्यापैकी पैसा खुळखुळेल. एखाद्या कामाच्या कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल.

मिथुन रास (Gemini)

आज भरपूर कष्ट कराल आणि सर्व कामे पार पाडाल. महिला खूप विचार करतील.

कर्क रास (Cancer)

एखाद्या गोष्टीची काळजी जास्त कराल अशा वेळी उत्साह आत्मविश्वास वाढवण्याची आवश्यकता आहे.

सिंह रास (Leo)

एखाद्या मध्यस्था तर्फे तुमचे काम होईल. टेलिफोन कॉम्प्युटर ट्रॅव्हल एजन्सी या संदर्भातील कामांना वेग येईल.

कन्या रास (Virgo)

बरेच दिवसांपासून एखादे काम डोक्यात असेल त्या कामाची सुरुवात करायला आजचा दिवस चांगला आहे.

तूळ रास (Libra)

मैदानी खेळ खेळणाऱ्यांना आपली कला चांगल्यापैकी इतरांसमोर दाखवता येईल. तेथे वेगवेगळ्या संधी मिळतील.

वृश्चिक रास (Scorpio)

संततीच्या संदर्भातील चांगल्या बातम्या कानावर येतील. गरोदर स्त्रियांनी काळजी घ्यावी.

धनु रास (Sagittarius)

महिला घरातील मंगल कार्यात भाग घेतील. संततीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

मकर रास (Capricorn)

परदेशासंबंधातील कामांमध्ये अडचणी येतील. शेजाऱ्यांशी मतभेद संभव संभवतात.

कुंभ (Aquarius)

नवीन कामाची सुरुवात करताना त्याबाबतीत तपशीलवार माहिती घ्यावी लागेल. त्यानुसार कामाची आखणी करा.

मीन (Pisces)

नोकरी व्यवसायात सर्व गुप्त गोष्टी इतरांसमोर न बोलणे चांगले. काही गोष्टी स्वतःजवळ राखून ठेवा.