मेष रास (Aries)

वडिलोपार्जित जमिनी संबंधीचे तंटे सोडवण्यात शक्ती आणि पैसा खर्च पडेल. महिलांना जरा जास्तच कष्ट पडतील.

वृषभ रास (Taurus)

आज कोणत्याही कामात यश मिळेल. व्यवसायात एखादी चांगली मनासारखी गोष्ट पटकन घडून जाईल.

मिथुन रास (Gemini)

शक्तीची आणि धाडसाची कामे करणाऱ्या लोकांना अनेक संधी मिळून जातील. आनंदी आणि खेळकर वृत्ती राहील.

कर्क रास (Cancer)

घरामध्ये तुमचे स्पष्ट आणि परखड विचार इतरांच्या पचनी पडणार नाहीत. महिलांना अति स्पष्टवक्तेपणा महागात पडेल.

सिंह रास (Leo)

एखादे काम होत आहे म्हणेपर्यंत बारगळण्याची शक्यता आहे. दैव देते आणि कर्म नेते याचा अनुभव घ्याल.

कन्या रास (Virgo)

कौटुंबिक जीवनात थोडे मानसिक त्रासाचे प्रसंग उदभवले तरी लवकरच त्यातून बाहेर पडाल.

तूळ रास (Libra)

पेराल तसे उगवतं हा विचार मनात धरून प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम करणं गरजेचं आहे.

वृश्चिक रास (Scorpio)

फार आर्थिक उन्नती साधता आली नाही तरी सुख शांती आणि समाधान यात्रेंचा अनुभव घ्याल.

धनु रास (Sagittarius)

नोकरीत नवीन आव्हाने समोर आली तरी तेथे प्रचंड कष्टाची तयारी असेल तरच स्वीकारा.

मकर रास (Capricorn)

पूर्वीच्या राहिलेल्या कामांना गती येईल. महिलांचे नवीन पैलू जगाला दिसतील.

कुंभ (Aquarius)

लेखकांना स्फूर्ती देणारा दिवस अनेक विचार सुचतील व तते कागदावर उतरवण्याची घाई होईल.

मीन (Pisces)

आज थोडा चिडचिडेपणा वाढेल. विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल. व्यवसाय-नोकरीत प्रगती होईल.