वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.
विशेषत: लग्न करताना वयामधील अंतराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे.
लग्न कोणतेही असू दे अरेंज की लव्ह पण सगळ्यात कॉमन विचारला जाणरा प्रश्न म्हणजे दोघांच्या वयात किती अंतर आहे?
आचार्य चाणक्य म्हणतात, लग्न हे एक आदर्श सामाजिक-धार्मिक नाते आहे. विवाह हा एक आध्यात्मिक अनुभव आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात की, यशस्वी विवाह म्हणजे ज्यामध्ये पती-पत्नी एकमेकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संतुष्ट करतात.
आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, लग्न करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की पती-पत्नीच्या वयात जास्त अंतर नसावे.
शारीरिकदृष्ट्या सक्षम पुरुषच आपल्या पत्नीच्या आकांक्षा पूर्ण करू शकतो.
अशा परिस्थितीत पती आणि पत्नीमध्ये जर जास्त अंतर असेल तर तो पत्नीला मानसिक आणि शारीरिक सुख देऊ शकत नाही.
आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की जर पत्नीची इच्छा पूर्ण झाली नाही तर ती दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होऊ शकते
आणि त्यामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)