अनेकांना आपण ज्या ताटात जेवतो, त्याच ताटात हात धुण्याची सवय असते. हिंदू धर्मात अन्नाला देवाचा दर्जा आहे. जेवलेल्या ताटात हात धुणं हे शास्त्रात अशुभ मानलं जातं असं केल्याने देवी अन्नपूर्णा कोपतात. देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात वास करत नाही. तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जेवल्यानंतर ताटातच हात धुतल्याने तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येते. तुमचा पैसा अनावश्यक गोष्टींवर खर्च होतो आणि पैशांची तंगी जाणवते. घरात हळूहळू पैशांची कमतरता भासू लागते. जेवणाचा अपमान करू नये देवी अन्नपूर्णा नाराज होते.