आपल्या कामामध्ये इतरांनी केलेली ढवळाढवळ तुम्हाला अजिबात चालणार नाही.
आज तुमच्या मनाची मानसिक बैठक चांगली ठेवायला लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे.
अतिभावनाशीलता कोणतेही निर्णय अचूक घेऊ देणार नाही.
जवळच्या लोकांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे.
अव्यवहारी निर्णयामुळे तोटा होऊ शकतो कोणतीही गुंतवणूक करू नये
थोडे आरंभशूर बनाल त्यामुळे निश्चयी भूमिका ठेवायला लागेल.
नोकरीमध्ये वरिष्ठासमोर तुमची बाजू स्पष्टपणे मांडायला लागेल.
तब्येतीची काळजी घ्या योग्य औषधोपचारामुळे तुमची कार्यक्षमता वाढू शकते.
व्यवसायात नवीन योजना साकार करण्यासाठी भांडवलाची गरज भासेल.
घरामध्ये मी म्हणेन ते प्रमाण अशी कृती ठेवली तर विरोध होई
स्वतःच्या कोशातच आज जास्त वावराल. त्यामुळे इतरांच्या स्वभावाचा अंदाज नीटसा येणार नाही
आज इतरांपेक्षा थोडे वेगळे वाटणार आहात. तुमच्यातील आनंदी वृत्ती इतरांना सुखावून जाईल.