वैवाहिक जीवनात थोडी वादळे निर्माण होतील. मतभेद सामंजस्याने सोडवणे हितकर ठरेल.
जुनी दुखणी डोके वर काढतील. सांधेदुखीचा पाठदुखीचा त्रास संभवतो.
कलाकार ना चांगल्या संधी मिळून त्यांच्या कलेचे चीज होईल.
कौटुंबिक सुखात थोडी कमतरता निर्माण होईल. स्त्रियांमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. महिलांना एकटेपणा जाणवेल.
गोंधळ घालणारे आणि निर्णय पटकन न घेणाऱ्या माणसांशी आज तुमचे जमणार नाही.
कामाच्या वेळी कामच करावे हा तुमचा आज दृष्टिकोन राहील.
उत्तम नेतृत्वाचा नमुना म्हणून तुमच्याकडे लोक बोट दाखवतील. महिला अनेक गोष्टींची सुरुवात मोठ्या उत्साहाने करतील.
मानापमानाच्या कल्पना जरा टोकदार होतीलच परंतु थोडा अहंकारही आज वाढणार आहे.
अंतर्मुख होऊन विचार करायला लागेल नाहीतर पोकळ डामडौल किंवा हीन अभिरूची कडे आकर्षित व्हाल.
व्यवसाय नोकरी स्वतः काम करण्यापेक्षा दुसऱ्याकडून काम करून घेण्याची वृत्ती वाढेल.
धरसोड वृत्तीमुळे कोणतेही काम पूर्णत्वाला जाणार नाही. जवळ असलेल्या सर्व पैसा खर्च कराल.