वास्तूच्या नियमांनुसार, घराच्या बाहेर आयताकृती आकाराची नेमप्लेट लावावी. गोलाकार किंवा त्रिकोणी आकाराची नेमप्लेट कधीही लावू नये. वास्तूशास्त्रानुसार, घराच्या बाहेर उत्तर किंवा पूर्व दिशेला नेमप्लेट लावावी. वास्तूशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, नेमप्लेटला घराच्या डाव्या बाजूला लावणं शुभ मानण्यात आलं आहे. नेमप्लेट तुटलेली नसावी. नेमप्लेटवर गणपतीचं स्वस्तिक असणं फार शुभ मानलं जातं. तुम्ही तांबे, स्टील किंवा पितळेच्या धातूची नेमप्लेट घरात लावू शकता. मान्यतेनुसार, प्लास्टिक किंवा दगडापासून बनविलेली नेमप्लेट घरात लावू नये. पांढऱ्या, पिवळ्या किंवा केशरी रंगाशी संबंधित नेमप्लेट लावणं शुभ मानलं जातं. नेमप्लेटच्या मागे कोळ्याचं जाळं, पाल किंवा चिमणीचं घरटं असणार नाही याची काळजी घ्या.