तुमच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात जास्त याल गप्पिष्ट पण अभ्यासू व्यक्ती तुमचा फायदा करून देईल.
घरामध्ये मोठ्या माणसांशी तुमची मते जुळणार नाही त्यामुळे वाद होतील व्यवसायात आर्थिक लाभ होतील.
तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची तुमची पद्धत नावीन्यपूर्ण राहील.
आज तुमच्या बाबतीत गैरसमज होऊ शकतात असे आणि लबाड माणसांपासून सावध राहा.
तुमची मते इतरांना न पटल्यामुळे थोडे वाद विवाद होतील पैशाची परिस्थिती सुधारेल.
आज खरेदीचा मूड राहील मान आणि अधिकार मिळवण्याचा प्रयत्न कराल.
घरामध्ये विचारपूर्वक संयम ठेवलात तर इतरांचे सहकार्य चांगले मिळेल.
आज स्वकर्तुत्वाने इतरांना दीपावून टाकाल तुमच्या कामांमध्ये नवीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न कराल.
दैवी उपासना एक प्रगती होईल तुमची अचाट कल्पनाशक्ती प्रगतीचा मार्ग दाखवेल.
महिला मानापमान जपतील विद्यार्थ्यांची वाचन आणि लिखाणात प्रगती होईल आणि लिखाणात प्रगती होईल
आज वड्याचे तेल वांग्यावर अजिबात काढू नका थोड्याशा कारणावरून मनस्वस्थ बिघडून घेण्याची वृत्ती राहील.
स्वतःबरोबर जवळच्या माणसांनाही अस्वस्थ करून टाकाल व्यवसाय धंद्याच्या ठिकाणी थोडी सहनशीलता ठेवायला हवी.