आज थोडी मानसिक अस्थिरता वाढवणारा दिवस असला, तरी तुम्हाला तो काहीतरी नवीन कामे करायला लावणारा निश्चित आहे.
आज मनाचा मोकळेपणा म्हणजे काय, हे लोक तुमच्याकडून शिकतील, त्यामुळे तुम्ही सर्वांना हवेहवेसे वाटाल.
आज व्यवसाय नोकरी जेवढे कष्ट कराल, त्यामानाने लाभ मात्र कमी मिळणार आहेत.
संततीच्या बाबतीत त्यांचे विचार आणि तुमचे विचार यामध्ये तफावत राहणार असल्यामुळे, थोडे तटस्थ धोरण ठेवावे लागेल.
अनेक संकल्प कराल आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून प्रयत्न होणार आहेत.
आज महिला आनंदी राहतील, भरपूर कष्ट कराल आता खालच्या लोकांचे सहकार्य ही उत्तम मिळेल .
आज तुम्ही स्वतः इतक्या आशावादी आहात की, तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल बरीच कामे साध्य होऊन जातील
आज जेथे काम करायला तुम्हाला आवडते, तेथे तुमची हजेरी न लागता नको त्या ठिकाणी तुम्हाला काम करावे लागेल
आज तुमच्या कर्तुत्वाला झळावी देणारे ग्रहण असले, तरी कष्टाला सीमा राहणार नाही त्यामुळे थोडे कंटाळून जाल
प्रकृती अस्वस्थ थोडे जाणवेल, विचार थोडे भरकटण्याची ही शक्यता आहे
आज महिलांना त्यांच्या कामाची पावती मिळेल, प्रकृतीच्या दृष्टीने मात्र जपावे लागणार आहे.
आज ज्यांना पाठीचे दुखणे रक्तदाबाचा विकार आहे, त्यांनी पथ्य पाणी सांभाळावे, औषध वेळेवर घ्यावे.