आज वैवाहिक जीवनात पेल्यातील वादळे उठतील, अशावेळी समजूतीचे धोरण स्वीकारा.
आज आरोग्याच्या बाबतीत प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आज ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सावध राहावे स्वतःचे काम स्वतः करण्यावर भर द्यावा.
आज मनुष्य परिस्थितीचा गुलाम असला तरी, कर्म तुमच्या हातात नक्कीच आहे हे लक्षात ठेवा.
जेवीन तर तुपाशी नाही तर उपाशी ही वृत्ती आज ठेवून चालणार नाही.
आज नोकरी व्यवसायात कामाचे जेवढे नियोजन कराल तेवढे यश चांगले मिळेल.
तुमची चिकाटी आज वाखणण्यासारखी असेल महिलांच्या धरणीपणाचा त्यांना फायदा होईल.
आज लोकांनी केलेल्या प्रतिकाराला तुम्हाला उत्तर द्यावे लागेल तिथे कुठेही कमी पडणार नाही.
आज समाजासमोर येऊन इतरांची मने जिंकण्यासाठी तुम्हाला जरा जास्त कष्ट घ्यावे लागतील.
नोकरी व्यवसायात तुम्हाला हवे तसे ग्रहमान लाभेल, त्यामुळे वाढलेली कामे मार्गी लागतील.
आज काहीतरी उलाढाल निश्चित कराल, स्वतःच्या मनासारख्या गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही.
आज वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता, वाहने जपून चालवा.