या विधीमध्ये जे राजघराण्यातील वंशज आहे ते सोन्याच्या झाडूने रथाची साफसफाई करतात ही परंपरा राजा गजपती दिव्यसिंहच्या काळापासून सुरु आहे.
याला देवाच्या परतण्याचा उत्सव बोलतात हा उत्सव आषाढ शुक्ल महिन्याच्या दशमीला साजरा केला जातो. या दरम्यान देवाला घेऊन येत 'पौड पीठ'चा नैवेद्य दाखवला जातो.
या विधीमध्ये सिंहदरबारासमोरील रथांवर विराजमान श्री जगन्नाथला सोन्याचे मुकूट आणि दागिने चढवले जातात.
निलाद्री बिजे : हा उत्सव आषाढ महिन्यातील बाराव्या दिवशी साजरा केला जातो भगवानच्या परतण्याच्या प्रथेला निलाद्री बीजे असे म्हणतात.
भगवान जगन्नाथ यांनी गुंडीच्या मंदिरात रथावर न नेल्यामुळे रागावलेल्या लक्ष्मीला शांत करण्यासाठी भाविक रसगोला अर्पण करतात.