वास्तुशास्त्रात बाथरूमसाठी काही खास नियमही सांगण्यात आले आहेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

वास्तूशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरात गरिबी आणतात.

Image Source: pexels

वास्तुशास्त्रानुसार, आपल्या बाथरूममध्ये चुकूनही तुटलेला आरसा लावू नये.

घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने घरात गरिबी येते आणि आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते.

Image Source: pexels

तुटलेली चप्पल बाथरूममध्ये अजिबात ठेवू नये.

वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा आणते.

Image Source: pexels

वास्तुशास्त्रात बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अशुभ मानले जाते.

घरात ठेवलेली रिकामी बादली अशुभ घडवते.

Image Source: pexels

तुमचा बाथरूमचा नळ खराब असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करा.

वास्तूनुसार नळातून टपकणारे पाणी घरात नकारात्मक ऊर्जा आणते.

Image Source: pexels

ओले कपडे बाथरूममध्ये ठेवू नयेत.

वास्तूनुसार, ओले कपडे असल्यास ते धुवा आणि लगेच घराबाहेर सुकविण्यासाठी ठेवा.

Image Source: pexels

वास्तूनुसार बाथरूममध्ये झाडे कधीही ठेवू नयेत.

असे मानले जाते की बाथरूममध्ये ठेवलेली झाडे लवकर खराब होतात आणि घरातील वास्तु दोष वाढवतात.

Image Source: pexels

टीप :

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)