तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.
आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका.
आज तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकता. सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता आहे.
तुम्हाला किडनीच्या संबंधित त्रास होऊ शकतो. अशा वेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.
जर तुमच्या एखाद्या आजारासंदर्भात गोळ्या सुरु असतील तर त्या वेळेत घेण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, तुमच्या तब्येतीवर येऊ शकतं.
ज्या लोकांची नुकतीच सर्जरी झाली आहे. अशा व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत अधिक निष्काळजीपणा करू नये.
मानसिक आजारी रुग्णांनी डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं.
किरकोळ आजार देखील गांभीर्याने घ्या आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. तुम्हाला सध्याच्या आजारांपासून लवकरच आराम मिळेल.
ग्रहांची स्थिती लक्षात घेता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील, गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी.
जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलकं वाटेल.
जर तुम्ही रोज वाकून काम करत असाल तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)