स्वप्न शास्त्रात, स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगण्यात आला आहे. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात. आपण स्वप्नात स्वत:ला पाहणं काय सूचित करतं ते जाणून घेऊयात. स्वप्नात स्वतःला रडताना पाहणे शुभ मानले जाते. याचा अर्थ भविष्यात तुम्हाला काही मोठे यश मिळू शकते. स्वप्नात तुमचे स्वतःचे अश्रू पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या काही समस्या संपू शकतात. स्वप्नात स्वतःला आनंदी दिसणे खूप शुभ मानले जाते. भविष्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. स्वप्नात स्वत:ला अन्न खाताना दिसणं हे एक प्रकारचं शुभ मानले जाते. याचा अर्थ भविष्यात तुम्हाला कोणत्याही आजारापासून आराम मिळू शकतो. स्वप्नात जर तुम्ही स्वत:ला हसताना दिसलात तर ते अशुभ मानले जाते. तुम्हाला भविष्यात काही वाईट बातमी मिळू शकते. आर्थिक नुकसान होऊ शकते. जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला पडताना दिसलात तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. स्वप्न विज्ञानानुसार, याचा अर्थ असा आहे की भविष्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही आजार होऊ शकतात.