श्रावण महिन्यातल्या सोमवाराला अनन्य साधारण महत्त्व आहे.

Published by: जगदीश ढोले

महादेव अविनाशी आहे, ज्याचा ना आदि, ना अंत आहे.

देवांचे देव महादेवाचं राहणीमान, निवासस्थान सर्वकाही इतर देवांपेक्षा वेगळं आहे.

महादेव यांना भस्म हा प्रिय आहे, ते आपल्या शरीरावर देखील भस्म लावतात.

भस्म हे महादेवसाठी दागिण्यासारखा आहे, महादेव वैरागी आहे, ते भस्म अंगाला लावून आपला शृंगार करतात.

श्रावणात जर तुम्ही महादेवाला भस्म अर्पण केला, तर त्यानं तुमच्या सर्वांच्या दुःखाचं निवारण होतं.

भगवान शंकराला भस्म अर्पण केल्यानं, भक्त हा सांसारिक मोहमायेपासून मुक्त होतो.

महादेव यांना भस्म हा केवळ पुरुषांनीच अर्पण करावा, स्त्रीयांनी भस्म अर्पण करु नये.

(टीप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)