संपूर्ण वर्षभरातील श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा आणि विविध सणांच्या सुरुवातीचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यात सोमवार हा शंकरदेवाची पूजा केली जाते. भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर. 06 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार च्या निमित्त भीमाशंकर येथील मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. शिवलिंगावर दुग्धाभिषेकांनी पूजा करून शिवलिंगाला भस्म लावले. पहाटेच्या पूजेला शंकर प्रिय बेल आणि भंडारा पिंडीवर वाहून पूजा केली. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी शंकराची विधिवत पूजा पर पडली. शिवलिंगाची पूजा ही अनेक अतिशय सुंदर फुले वाहून पूर्ण केली. भीमाशंकर येथील शिवमंदिरात सकाळी महाआरती ही करण्यात आली. मंदिऱ्यातील गाभऱ्यावर विविध आकर्षक फुलांची आरास केली आहे. मंदिराचा परिसर हा डमरू आणि शंकराच्या नादाने दुमदुमला. 06 ऑगस्ट चा पहिला श्रावण महिना अतिशय वेगळा आहे. हिरव्यागर वातावरणात,पांढऱ्या शुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर रिमझिम पावसात न्याहाळुन गेला आहे. भाविकांच्या लांबच लांब रांगा पहाटेपासून भाविक दर्शनरांगेत उभे आहेत.