भारताप्रमाणेच जगभरात आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज नवरात्रीची पहिली माळ आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. 9 दिवस चालणार्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, देवी शैलपुत्री, देवी दुर्गेच्या पहिल्या रूपाचे पूजन केले जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, देवी शैलपुत्रीची पूजा करण्यापूर्वी शुभ मुहूर्तावर घटस्थापना करा. अखंड ज्योत प्रज्वलित करा आणि श्रीगणेशाचे आवाहन करा. शैलपुत्री देवीला पांढरा रंग आवडतो. देवी शैलपुत्रीला कुंकू, पांढरे चंदन, हळद, अक्षता, शेंदूर, सुपारी, लवंग, नारळ आणि श्रृंगाराच्या 16 वस्तू अर्पण कराव्यात. देवीला पांढरी फुले आणि पांढरी मिठाई अर्पण करा. देवी शैलपुत्रीच्या मंत्रांचा जप करा आणि नंतर आरती करा.