लोकांना तुमच्या योजना सांगून त्याचं महत्त्व कमी करू नका. तुम्ही जेव्हा यश मिळवाल, तेव्हा तुमचं काम आपोआप बोलेल .
कुटुंबातील समस्या तुमचीच असतात. त्यांचं समाधान तुम्हीच शोधायला हवं. कधीही सार्वजनिक चर्चा करू नका.
सुरक्षित राहण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी, कमकुवतपणांबद्दल बोलणं टाळा.
स्वतःच्या यशाची प्रशंसा स्वतःपुरती ठेवा. तुमच्या कृत्यांमधून तुमची वीरता दिसेल.
तुमचं उत्पन्न, खर्च किंवा आर्थिक स्थिती शेअर करणं अनावश्यक आहे. पैसे नेहमी गुपितातच सुरक्षित असतात.
तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील खाजगी गोष्टींबद्दल चर्चा करणे टाळा. सगळं जग जाणून घेण्याची गरज नाही.
तुमचं ध्येय सार्वजनिक करण्यापेक्षा, त्यावर शांतपणे काम करा. तुमचं यशच तुमचं ध्येय व्यक्त करेल.
यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)