हिंदू धर्मानुसार, जमिनीखाली तयार होणार्या भाज्यांचं अर्थात कंदमुळांचं सेवन पितृपक्षात करू नये.
कंदमुळांमध्ये बटाटा, मुळा, रताळी यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो.
शास्त्रात म्हटलं गेलंय की, प्रत्येक खाद्यपदार्थांच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर, मानसिकतेवर परिणाम होतो.
पितृपक्षात आहार आणि आचार हा सात्त्विक असावा असं शास्त्र सांगतं.
पितृपक्षात मसूर डाळ देखील खाऊ नये किंवा मसूर डाळीचा नैवेद्य देखील पितरांना दाखवू नये.
तुम्हाला वडे वैगेरे बनवायचे असतील तर तुम्ही इतर डाळींचा वापर करू शकता, परंतु मसूर डाळीचा वापर करू नये.
पितृपक्षात चणे खाणंही चुकीचं मानलं गेलं आहे.
हिंदू धर्मातील प्रथेनुसार, पितृपक्षात मांसाहार किंवा अंडं खाणं पूर्णपणे वर्ज्य आहे.
यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)