या काळात अनेक योगही निर्माण होतात.
ऑगस्ट महिन्यात भूमिपुत्र मंगळ, बुद्धी आणि वाणीचा कारक ग्रह बुध, सुख-शांती वैभवचा कारक ग्रह शुक्र राशी परिवर्तन करणार आहेत.
याचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे.
नोकरदार वर्गातील लोकांनी या काळात सांभाळून राहण्याची गरज आहे.
तुम्हाला कोणतंही काम करताना फार सतर्क राहावं लागेल.
या काळात पैशांचा देखील जपून वापर करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आर्थिक चणचण भासू शकते.
मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना फार अशुभ असणार आहे.
या दरम्यान तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला अपयश येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)