शनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित आहे.

Published by: जयदीप मेढे

शनिवारच्या दिवशी शनीला न आवडणारी कामं केल्यास शनिदेव क्रोधित होतात आणि आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे येऊ लागतात.

शनिवारी नेमक्या कोणत्या गोष्टी टाळाव्या? जाणून घेऊया

शनिवारी केस धुवू नका किंवा दाढी करू नका

शनिवारच्या दिवशी केस धुतल्याने किंवा दाढी केल्याने शनि दोष निर्माण होतो.

Image Source: pexels

शनिवारी नखं कापू नये

शनिवारी नखं कापल्यास घरात दारिद्र्य येते आणि त्याचा घरावर वाईट परिणाम होतो.

मोहरीचं तेल खरेदी करू नका

शनिवारी मोहरीचे तेल किंवा इतर कोणतंही तेल खरेदी करू नये. या दिवशी तेल खरेदी केल्याने घरात दारिद्र्य येते. या दिवशी मोहरीचं तेल दान करणं शुभ मानलं जातं.

Image Source: pexels

मीठ खरेदी करू नका

शनिवारी मीठ घरी आणल्याने किंवा घरातील मीठही कुणाला दिल्याने घरावरील कर्ज वाढतं आणि तुम्हाला अनेक रोग बळावू शकतात.

Image Source: pexels

शनिदेवाच्या डोळ्यात पाहू नये

शनिवारी शनि मंदिरात जात असाल तर लक्षात ठेवा की चुकूनही त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहू नये. असं करणं हा शनिदेवाचा अपमान मानला जातो.

मांसाहार करू नका

शनिवारी कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये. शनिवारी कोणत्याही प्राण्याला मारल्याने किंवा यातना पोहोचवल्याने शनीचा कोप होतो.

Image Source: pexels

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)